अमरावती येथे पारपत्र कार्यालयातील सर्व्हर ‘डाऊन’ झाल्याने कामकाज ठप्प !

प्रशासनाचा भोंगळ कारभार !

अमरावती – सर्व्हर ‘डाऊन’ झाल्याने येथील पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. सर्व्हर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी २ वाजून १५ मिनिटांपर्यंत बंद होता. त्यानंतर तो चालू झाला. नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागल्याने अनेकांनी या प्रकारामुळे रोष व्यक्त केला.