नशा येण्यासाठी घेतल्या जाणार्‍या झोपेच्या ६ सहस्र गोळ्यांची जादा दराने विक्री !

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विकता न येणार्‍या आणि नशा येणार्‍या झोपेच्या ६ सहस्र गोळ्या विकणार्‍या आणि त्याची बनावट देयके करून शासनाची फसवणूक करणार्‍या मेडिकल दुकानदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्या अन्वये वाघोली येथील साई अरिहंत जेनरिक या मेडिकल दुकानाचे मालक महावीर देसरडा (वय ३४ वर्षे) आणि त्यांच्याकडून औषध खरेदी करणारे यांवर गुन्हा नोंद केला आहे. दुकान मालकाने ‘अल्प्रेक्स’ या औषधाच्या ६ सहस्र गोळ्या जादा दराने विकल्या, तसेच बीड येथील न्यू विहान मेडिकल यांच्या नावे बनावट देयके सिद्ध करून शासकीय अधिकार्‍याला देयकांची खोटी माहिती देऊन प्रशासनाची फसवणूक आणि दिशाभूल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.