संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याची पोहरादेवीच्या महंतांची  मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

डावीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड

मुंबई, २३ जून (वार्ता.) – शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर महंत बाबूसिंग महाराज यांनी बंजारा समाजाच्या भावना लक्षात घेऊन मंत्रीमंडळ विस्तारात संजय राठोड यांना स्थान देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना दिली.
संजय राठोड यांच्यावरील आरोपांविषयी अन्वेषण अहवाल प्राप्त व्हावा, यासाठी काही दिवसांपूर्वी पोहरादेवी संस्थानच्या ६ महंतांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांचीही  भेट घेतली होती. कु. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणानंतर संजय राठोड यांनी मंत्रीपदाचे त्यागपत्र दिला होता.

सौजन्य टीवी 9