अभिनेत्री केतकी चितळे यांना जामीन संमत !

केतकी चितळे

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट केल्याचा केतकी यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

केतकी यांनी शरद पवार यांच्याविषयी अपमानास्पद फेसबूक पोस्ट केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. हा गुन्हा रहित करण्यात यावा, अशी मागणी करत केतकी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सूडबुद्धीने नोंद केल्याचा दावाही केतकी यांनी याचिकेतून केला होता. त्यानंतर आता केतकी यांना जामीन संमत करण्यात आला आहे.