परिवहनमंत्री अनिल परब यांच्या ७ ठिकाणी ‘ईडी’च्या धाडी !

मुंबई – राज्याचे  परिवहनमंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील निवासस्थानी २६ मे या दिवशी सकाळी ६ वाजता अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकल्या. मुंबई, रत्नागिरी आणि पुणे येथील ७ ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.

अनिल परब यांचे निकटवर्ती असणारे पुणे येथील विभास साठे यांच्या निवासस्थानीही धाड टाकण्यात आली. अनिल परब यांनी साठे यांच्याकडून दापोली येथील ‘रिसॉर्ट’ खरेदी केले होते. या रिसॉर्टच्या बांधकामासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता असल्याचा आरोप आहे.