मंगळुरूची मशीद पूर्वीचे हिंदूंचे मंदिर !

रामांजनेय भजन मंदिरात घेतलेल्या ‘तांबूल प्रश्ना’तून मिळाले उत्तर

‘तांबूल प्रश्न’ म्हणजे कौल घेण्याचा एक प्रकार

मशिदीची डागडुजी करतांना सापडलेला मंदिराचा खांब.

मंगळुरू (कर्नाटक) – येथील मळली भागातील असय्यीद अब्दुल्लाहिल मदनी मशिदीमध्ये मंदिराच्या खुणा आणि चिन्हे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जवळच असलेल्या रामांजनेय भजन मंदिरातील केरळचे प्रख्यात ज्योतिषी दैवज्ञ गोपालकृष्ण पणिक्कर यांच्या माध्यमातून ‘तांबूल प्रश्न’ विचारण्यात आला. त्यात ही मशीद ‘मंदिर’ असल्याचे सांगण्यात आले आहे.

या माहितीत ज्योतिषी दैवज्ञ गोपालकृष्ण पणिक्कर म्हणाले, ‘‘सहस्रो वर्षांचा इतिहास असलेले देवस्थान आहे. तपस्वी व्यक्तींकडून येथे देवस्थान उभारले होते; परंतु कोणती देवता ?, तिचे योग्य ठिकाण (देवता सापडण्याचे) शोधावे लागेल. ते शोधण्यासाठी ‘तांबूल प्रश्ना’ऐवजी ‘अष्टमंगळ प्रश्ना’च्या (कौलाच्या आणखी एका प्रकाराच्या) माध्यमातून स्पष्ट माहिती मिळेल.’’