सतना (मध्यप्रदेश) येथे नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड

सतना शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान  जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

कुपवाड येथील जुमागुंड गावात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. हे तिघेही आतंकवादी लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी होते. यापूर्वी २५ मे या दिवशी जैश-ए-महंमदच्या ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते.

ताजमहलमध्ये नमाजपठण करण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा पर्यटकांना अटक

आगरा येथील ताजमहाल परिसरात २५ मे या दिवशी नमाजपठण करण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ पर्यटकांना पोलिसांनी अटक केली. यांतील ३ भाग्यनगरचे, तर १ आझमगडचा आहे.

काबूलमधील बाँबस्फोटांत १६ जण ठार

काबूल येथे २५ मेच्या सायंकाळी एकापाठोपाठ एक अशा ४ बाँबस्फोटांमध्ये १६ जण ठार, तर २२ जण घायाळ झाले. मजार-ए-शरीफ शहरात एका मशिदीत, तसेच प्रवासी व्हॅनमध्ये ३ बाँबस्फोट झाले.

आदिवासींचे धर्मांतर केले जात असल्यावरून प्रशासनाकडून ओडिशातील चर्च बंद  

देशातील प्रत्येक चर्चमध्ये असे काही घडते का ? याचा शोध घेऊन दोषी चर्चवर अशाच प्रकारची कारवाई करावी, अशी हिंदूंनी मागणी केली, तर त्याच चुकीचे ते काय ?

जशपूर (छत्तीसगड) येथे प्राचीन शिवमंदिरातून शिवलिंगाची चोरी

ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाला काही मुसलमानांकडून विरोध होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अशी घटना घडते, याचा अर्थ काय घ्यायचा ?

यज्ञाचे महत्व !

‘मनुष्याच्या शरिरात जंतू असले, तर ते शरिरात घेतलेल्या औषधामुळे मरतात. त्याचप्रमाणे वातावरणातील नकारात्मक रज-तम हे यज्ञातील स्थूल आणि सूक्ष्म धुरामुळे नष्ट होतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

टेक्सास (अमेरिका) येथे तरुणाचा शाळेत गोळीबार : २ शिक्षक आणि १९ विद्यार्थी ठार

अमेरिकेत खाद्यपदार्थांप्रमाणे बंदुका विकल्या जातात. लोकांकडे एकहून अधिक बंदुका असतात. अशा बंदुका संस्कारहीन मुले आणि तरुण यांच्या हातात सहज सापडतात अन् अशा घटना घडतात !

(म्हणे) ‘श्रीकृष्णजन्मभूमी न्यास नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठच याचिका प्रविष्ट करत आहेत !’

श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणी मुसलमान पक्षाचा आरोप

यासीन मलिक याला जन्मठेप

यासीन मलिक याला शिक्षा सुनावण्याच्या पूर्वी श्रीनगर येथे त्याच्या समर्थकांकडून सुरक्षादलांवर दगडफेक करण्यात आली. अशा आतंकवाद्यांना जन्मठेप नाही, तर फाशीचीच शिक्षा व्हायला हवी !