काबूलमधील बाँबस्फोटांत १६ जण ठार

काबूल (अफगाणिस्तान) – येथे २५ मेच्या सायंकाळी एकापाठोपाठ एक अशा ४ बाँबस्फोटांमध्ये १६ जण ठार, तर २२ जण घायाळ झाले. मजार-ए-शरीफ शहरात एका मशिदीत, तसेच प्रवासी व्हॅनमध्ये ३ बाँबस्फोट झाले. मशिदीत झालेल्या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला.

बल्ख प्रांताचे पोलिसांचे प्रवक्ते महंमद आसिफ वजेरी यांनी सांगितले की, हे आक्रमण अफगाणिस्तानमधील अल्पसंख्य असलेल्या शिया समुदायाला लक्ष्य करण्यासाठी करण्यात आले. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले आहे.