काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

कुपवाड (जम्मू-काश्मीर) – येथील जुमागुंड गावात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ आतंकवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले. हे तिघेही आतंकवादी लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी होते. यापूर्वी २५ मे या दिवशी जैश-ए-महंमदच्या ३ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते.

काश्मीरमध्ये अभिनेत्री अमरीन भट यांची हत्या

आतंकवाद्यांनी २५ मेच्या रात्री दूरचित्रवाहिनीवरील अभिनेत्री अमरीन भट यांची गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारात भट यांच्या पुतण्यालाही गोळी लागली.