सतना (मध्यप्रदेश) येथे नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड

सतना (मध्यप्रदेश) – सतना शहरातील चौकात असलेल्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याची काही लोकांनी तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही समाजकंटक नेहरूंच्या पुतळ्यावर काठीने प्रहार, तसेच दगडफेक करत आहेत. तोडफोड करणारे समाजकंटक राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारच्या विरोधात घोषणा देत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.