ताजमहलमध्ये नमाजपठण करण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघा पर्यटकांना अटक

आगरा (उत्तरप्रदेश) – येथील ताजमहाल परिसरात २५ मे या दिवशी नमाजपठण करण्याचा प्रयत्न करणार्‍या ४ पर्यटकांना पोलिसांनी अटक केली. यांतील ३ भाग्यनगरचे, तर १ आझमगडचा आहे. ‘ताजमहाल मशीद व्यवस्था समिती’च्या अध्यक्षांनी या कारवाईवर अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

या प्रकरणी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि अधीक्षक डॉ. राजकुमार पटेल म्हणाले की, कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ताजमहाल मशिदीत नमाजपठण करण्यासाठी केवळ शुक्रवारचा दिवस निश्‍चित करण्यात आला आहे. उर्वरित दिवस नमाजपठण करता येऊ शकत नाही.