बिहारमध्ये वादळी पावसामुळे ३३ जणांचा मृत्यू

पाटलीपुत्र (बिहार) – बिहारमध्ये २० मे या दिवशी अचानक मोठ्या प्रमाणात वादळी वार्‍यांसह पाऊस पडला. काही घंटे पडलेल्या या पावसामुळे राज्यात मोठी हानी झाली. १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाइकांना सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतांना ‘देव मृतांच्या नातेवाइकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो’, अशी प्रार्थना केली.