लक्षद्वीप येथील समुद्रात २ नौकांमधून सापडले १ सहस्र ५२६ कोटी रुपयांचे हेरॉईन !

जप्त केलेले हेरॉईन

लक्षद्वीप – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (‘डी.आर्.आय.’च्या) साहाय्याने तटरक्षक दलाने येथील समुद्रात २ नौकांमधून १ सहस्र ५२६ कोटी किमतीचे २१९ किलो हेरॉईन जप्त केले.

हे हेरॉईन कुठून आणण्यात आले होते, याची चौकशी करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात अनुमाने २५ सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.