ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारे प्रा. रतन लाल यांना अटक आणि सुटका

प्राध्यापक रतन लाल

नवी देहली – देहली पोलिसांनी देहली विश्‍वविद्यालयाच्या हिंदु महाविद्यालयाचे असोसिएट प्राध्यापक रतन लाल यांना ज्ञानवापी मशिदीत सापडलेल्या शिवलिंगाविषयी फेसबूकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून अटक केली आहे. त्यांची नंतर येथील न्यायालयाने ५० सहस्र रुपयांच्या जातमुचल्यावर जामिनावर सुटका केली. रतन लाल यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ‘१५३ अ’ आणि ‘२९५ अ’ यांच्या अंतर्गत गुन्हा नोंदवून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यापूर्वी रतन लाल यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून ‘मला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली होती. रतन लाल यांनी पोस्ट केलेल्या मजकुरात काय होते, हे समजू शकलेले नाही.

संपादकीय भुमिका

अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे म्हणजे अन्य कुणाला अशा प्रकारे हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्याचे धाडस होणार नाही !