उद्योगाचा विस्तार करण्यासाठी काही पंचायती लाच मागत असल्याने सरकारने उद्योगांसाठी ‘एक खिडकी’ योजना राबवावी ! – दामोदर कोचकर, अध्यक्ष, गोवा राज्य औद्योगिक संघटना

दामोदर कोचकर यांना अशी मागणी करावी लागणे, यावरून राज्यात भ्रष्टाचार किती तळागाळात पसरला आहे ? हे लक्षात येते !

गोव्याच्या राज्यपालांच्या नावाने भामट्यांकडून अनेक पत्रकारांकडे पैशांची मागणी

गोव्याचे राज्यपाल पी.एस्.श्रीधरन् पिल्लई यांच्या नावाने २२ एप्रिल या दिवशी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून राज्यात अनेक पत्रकारांकडे पैशांची मागणी करण्यात आली. गुन्हे अन्वेषण विभागाने या घटनेच्या अन्वेषणाला प्रारंभ केला आहे.

महावितरणच्या कोलगाव उपकेंद्रातील कर्मचार्‍यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

या प्रकरणी २२ एप्रिलला अमित वेंगुर्लेकर आणि देवीदास वेंगुर्लेकर या दोघांना अटक करण्यात आली होती.

कोकण रेल्वेमार्गावरील गाड्या १ मेपासून विजेवर धावणार

कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आता पूर्ण झाले असून १ मे २०२२ पासून रेल्वेगाड्या विजेच्या इंजिनवर धावणार आहेत. त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास जलद आणि प्रदूषणविरहित होईल, असा विश्‍वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

भारतातील हिंदूंमध्ये हिंदु धर्म सोडला, तर भाषा, सण, उत्सव, कपडे  इत्यादी  विविध राज्यांमध्ये निरनिराळे आहेत. त्यामुळे हिंदूंना केवळ धर्मच एकत्र आणू शकतो.

राणा दांपत्य आणि शिवसेना यांच्या वादामधील निरर्थक गोष्टींचे वृत्तवाहिन्यांकडून सलग ३ दिवस थेट प्रक्षेपण !

भारतात हिंदूंवर होणारे अत्याचार, तसेच धर्मांधांचा उद्दामपणा वाढत आहे. देशावर अनेक संकटे ओढवली असतांना निरर्थक गोष्टींचे भांडवल करून त्याचे घंटोन्घंटे प्रसारण करणे, हे वृत्तवाहिन्या भरकटल्या असल्याचे द्योतक आहे. अशी पत्रकारिता लोकांना दिशादर्शन काय करणार ?

देहलीतील ४० गावांची इस्लामी नावे पालटण्याचा प्रस्ताव आप सरकारला देणार ! – भाजप

केवळ देहलीतीलच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील गुलामीची दर्शक असणारी इस्लामी नावे पालटण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे यांनी प्रयत्न केला पाहिजे !