आय.एन्.एस्. विक्रांत जहाजाच्या संवर्धनासाठी किरीट सोमय्या यांनी जमवलेले पैसे पक्षाला दिले !

सरकारी अधिवक्ता प्रदीप घरत यांची माहिती

मुंबई – आय.एन्.एस्. विक्रांत जहाजाच्या संवर्धनासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गोळा केलेले पैसे पक्षाला दिले आहेत, अशी माहिती सरकारी अधिवक्ता प्रदीप घरत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. या पैशांच्या अपहाराप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे किरीट सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत आरोपींनी हे पैसे पक्षाला दिले असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी ‘केवळ ११ सहस्र ५०० रुपये जमा केले’, असे सांगितले; मात्र ‘अपहार १ पैशांचा असो किंवा १ कोटी रुपयांचा तो अपहारच आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना पोलीस कोठडी मिळावी’, अशी मागणी प्रदीप घरत यांनी केली.