मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांच्या अधिवक्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले. आय.एन्.एस्. विक्रांत जहाजाच्या संवर्धनासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गोळा केलेल्या पैशांचा त्यांनी अपहार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका केली होती; मात्र ती फेटाळण्यात आली आहे. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर १२ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.