प्राज्ञ पाठशाळा मंडळ महत्त्वाची संस्था ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

उदय सामंत

सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – अलीकडे देशात ‘धर्म’ या संकल्पनेचे विविध अर्थ लावले जात आहेत. अशा वेळी विवेकी दृष्टीने धर्माचा विचार करणारी, समाजाला त्याविषयी योग्य मार्गदर्शन करणारी वाई येथील प्राज्ञ पाठशाळा मंडळ ही संस्था अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. वाई (जिल्हा सातारा) येथील प्राज्ञ पाठशाळा मंडळ या संस्थेने शतकाची वाटचाल पूर्ण केली. त्या वेळी आयोजित कार्यक्रमत ते बोलत होते.

ते म्हणाले, प्राज्ञ पाठशाळेच्या कार्याला महाविकास आघाडी सरकार योग्य ते अर्थसाहाय्य करेल. संस्थेच्या इमारतीच्या बांधण्याविषयी आम्हीही कटीबद्ध आहोत. महाराष्ट्रात १२ सहस्रांहून अधिक ग्रंथालये आणि असंख्य महाविद्यालये आहेत. या सर्वांना मंडळाच्या नवभारत मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी योग्य ते आदेश देण्यात येतील.