अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासठी सरकारी निधीतूनच बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये ‘इफ्तार पार्टी’ आयोजित केली जाते; मात्र हिंदूंच्या कोणत्याही सणाला सरकारी निधीतून साहाय्य केल्याचे ऐकिवात नाही. हिंदु पोलीस बहुसंख्य असतांनाही ‘पोलीस ठाण्यात देवाचे एकही चित्र लावायचे नाही’, ‘पोलीस ठाण्यात श्री सत्यनारायण पूजा करायची नाही’, असे आदेश काढले जातात. हा निधर्मी शासनप्रणालीतील भेदभाव नव्हे का ? – संपादक
पुणे – येथील खडक पोलीस ठाणे आणि भोई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ९ एप्रिल या दिवशी सायंकाळी खडक पोलीस ठाण्याच्या परिसरात मुसलमानांसाठी आयोजित केलेला रोजा इफ्तार कार्यक्रम पार पडला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताक पटेल, सलीम शेख, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलींद भोई आदी उपस्थित होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट म्हणाले, ‘‘रोजा इफ्तारसारखे उपक्रम पोलीस आणि समाज यांना एकत्र आणून सामाजिक ऐक्य निर्माण करण्यास उपयुक्त ठरत आहेत.’’