राज्यात २ सहस्र ५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क उभारणार ! – मंत्रीमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती आस्थापनाला (महानिर्मिती) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पाेरेशन लिमिटेड समवेत हा प्रकल्प संयुक्तपणे उभारण्यात येणार आहे.

एस्.टी. महामंडळाच्या ‘विठाई’ बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवणार !

एस्.टी. महामंडळाच्या विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकणे, मळ लागणे असे प्रकार होत असल्यामुळे हिंदु जनजागृती समितीने विठाई बसगाड्यांवरील श्री विठ्ठलाचे चित्र हटवण्याची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती.

(म्हणे) ‘राज ठाकरे यांना अटक करा !’ – अबू आझमी, समाजवादी पक्ष

आझमी म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांच्या सारख्यांना किंमत नाही. तेच लोक धार्मिक तेढ वाढवत आहेत. त्यामुळे त्यांना अटक करा. राज ठाकरे यांची सभा शांतता क्षेत्रात झाली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. काही लोक लोकशाहीला धोका निर्माण करत आहेत.

मुंबई वेगळी करण्याच्या भाजपच्या कटाचे किरीट सोमय्या हे सूत्रधार ! – संजय राऊत, खासदार

‘मुंबईवर केंद्राचे राज्य आणायचे आहे. हा महाराष्ट्रद्रोह आहे. किरीट सोमय्या यांनी नौटंकी बंद करावी. त्यांनी विक्रांतसाठी गोळा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा. तुम्ही देशाला आणि महाराष्ट्राला फसवत आहात’, असेही राऊत यांनी म्हटले.

ओला-उबरमध्ये बहुतेक चालक हिंदु नसणे हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ! – नितेश राणे, आमदार

ओला-उबर या खासगी प्रवासी वाहतूक आस्थापनांमध्ये बहुतेक चालक हे हिंदू नाहीत, हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे मत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे. याविषयी त्यांनी ट्वीट केले आहे.

रा.स्व. संघाची मानहानी केल्याप्रकरणी लेखक आणि प्रकाशक यांना नोटीस !

हिंदूंनो, समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीला धावून जाणाऱ्या संघाची पाठ्यपुस्तकात मानहानी करण्यात येणे, हे साम्यवाद्यांचे छुपे षड्यंत्र असल्याचे जाणा !

परळ (मुंबई) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण !

धर्मवीर संभाजी महाराज यांचा पराक्रम आणि बलीदान यांची माहिती युवा पिढीला व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी फाल्गुन मास हा ‘बलीदान मास’ म्हणून साजरा केला जातो.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी स्थगित !

अंमलबजावणी संचालनालयाने देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. ते या कटामागचे सूत्रधार (मास्टर माईंड) आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ७ एप्रिल या दिवशी कोल्हापूर येथे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

उजनी (जिल्हा सोलापूर) धरणातील दूषित पाण्याचा प्रश्न कायम !

सहस्रावधी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नामध्ये पर्यावरण मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून उजनी धरणातील दूषित पाण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काढावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. तसेच दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईही व्हायला हवी !