पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारच्या विरोधात आज पुन्हा अविश्वादर्शक ठराव !

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल या दिवशी संसद पुन्हा स्थापित करून पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव सादर करण्यात यावा, असा आदेश दिला होता.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात मधू नावाचा हिंदु युवक घायाळ !

कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असतांना धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण करण्याचे धाडस होतेच कसे ? राज्य सरकारने अशांवर कठोर कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

श्रीलंकेत भारतीय सैन्य तैनात होणार नाही ! – भारतीय उच्चायुक्त 

श्रीलंकेतील आर्थिक संकटावरून निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे येथे भारतीय सैन्य तैनात करण्याविषयी चर्चा चालू आहे. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यांनी ‘याविषयीच्या अफवा निराधार आहेत’, असे म्हटले आहे.

राज्यांतील नागरिकांनी एकमेकांशी संवाद साधतांना इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करावा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा इंग्रजीत नव्हे,तर हिंदीत संवाद साधावा, असा सल्ला गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.

शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर एस्.टी. कर्मचाऱ्यांचे आक्रोशपूर्ण आंदोलन !

एस्.टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला महाविकास आघाडी सरकार उत्तरदायी आहे, असा आरोप करत ८ एप्रिल या दिवशी वरळी येथील ‘सिल्व्हर ओक’ या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एस्.टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

उदगीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार !

उदगीर (जिल्हा लातूर) येथे २२ ते २४ एप्रिल या कालावधीत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.

केंद्राच्या विविध योजना आणि त्याला लोकसहभागाची जोड यांद्वारे कोल्हापूर शहराचा विकास करू ! – चंद्रकांत पाटील, भाजप, प्रदेशाध्यक्ष

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपचा वचननामा घोषित !

आयकर विभागाकडून शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता कह्यात !

आयकर विभागाने शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या आणखी ४१ संपत्ती कह्यात घेतल्या आहेत. या मालमत्तांमध्ये त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही कारवाई झाली आहे.

नाशिक येथे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या कार्यालयात व्यवस्थापकाची प्रतिदिन मेजवानी !

शैक्षणिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती करणाऱ्या विद्येच्या घरात असे लज्जास्पद कृत्य करणारे व्यवस्थापक लक्ष्मण डामसे यांच्यावर बडतर्फीची कारवाई त्वरित व्हायला हवी.

नागपूर येथील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवा, अन्यथा आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करू !

पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे मनसेची चेतावणी !