मुंबई – धर्मवीर संभाजी महाराज यांचा पराक्रम आणि बलीदान यांची माहिती युवा पिढीला व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी फाल्गुन मास हा ‘बलीदान मास’ म्हणून साजरा केला जातो. त्याप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या परळ विभागाच्या वतीने बलीदान मास साजरा करण्यात आला. १ एप्रिल या दिवशी परळ येथे मूकपदयात्रा काढून धर्मवीर संभाजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ज्येष्ठ धारकरी सर्वश्री सुनील भूमकर, शर्दुलराव खरपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग येथे श्री. प्रवीण पवार यांसह त्यांच्या कुटुंबियांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सौ. रमा सावंत, सर्वश्री बळवंतराव जाधव, राजेंद्र सावंत, नीलेश पवार, करण परब, सूरज पिसाळ, अवधूत केसरे, वेदांत पाटील, सनातन संस्थेचे गणेश दुखंडे, हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद मानकर यांसह बहुसंख्य हिंदु धर्मप्रेमी सहभागी झाले होते.