मुंबई – राज्यात २ सहस्र ५०० मेगावॅट क्षमतेचे अल्ट्रामेगा सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती आस्थापनाला (महानिर्मिती) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पाेरेशन लिमिटेड समवेत हा प्रकल्प संयुक्तपणे उभारण्यात येणार आहे. ७ एप्रिल या दिवशी मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. यामध्ये ५०:५० या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राज्यशासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत असेल. राज्यात २१ एप्रिलपर्यंत १७ सहस्र ३६० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विकसित करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.