देशातील अनेक समस्यांवर एकच उपाय ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ ! – संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती

धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच आज देशाची वाताहत झाली आहे. देशात लव्ह जिहाद, धर्मांतरण, गोहत्या, लोकसंख्येचा विस्फोट, गडकोट दुरवस्था अशा अनेक समस्या वाढत आहेत.

बादशाहांचा क्रूर इतिहास शिकवा !

पाठ्यपुस्तकातून बाबर, अकबर, औरंगजेब आदी धर्मांध बादशाहांची क्रूर अत्याचारांची माहितीही इतिहासातून शिकवा, म्हणजे पुढच्या पिढ्या सावध रहातील ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

(म्हणे) ‘हिंदु धर्मात समानता आणि मानवता नव्हती, तर राज्यघटनेमुळे ती आली !’ – अभय ठिपसे, माजी न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय

राज्यघटनेमध्ये समानता, मानवता आदी आणण्यासाठी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्मग्रंथांचा आधार घेतला होता, हे माजी न्यायमूर्ती विसरले का ?

अमली पदार्थविरोधी पथकाचे पंच आणि साक्षीदार प्रभाकर साईल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

आर्यन खान याच्याशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर हे अमली पदार्थविरोधी पथकाचे स्वतंत्र साक्षीदार होते. धाडसत्राच्या वेळी स्वतः क्रूझवर उपस्थित असल्याचा दावा त्यांनी केला होता.

भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे ६ एप्रिलपासून सेवा सप्ताहाचे आयोजन !

या निमित्ताने शहरात भाजपद्वारे नालेस्वच्छतेच्या कामांची पहाणी आणि देखरेख अभियान राबवून मुंबईकरांची सेवा करणार आहेत. मुंबई येथे १ सहस्र ५०० पेक्षांहून अधिक ठिकाणी या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपचे नेते आणि अधिवक्ता आशिष शेलार दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !

या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्हीच आम्हा सर्व साधकांना साधना करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शक्ती, बुद्धी, चैतन्य अन् आध्यात्मिक बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्यात आली.

अमरावती येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा पार पडली !

एक दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेला अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील धर्मप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला. पू. अशोक पात्रीकर आणि श्रीमती विभा चौधरी यांनी हिंदु राष्ट्र संघटक होण्यासाठी ‘साधनेचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना’ यांविषयी मार्गदर्शन केले.

हिदूंचा नववर्षारंभ शोभायात्रा आणि गुढीपूजन यांनी साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढीपूजन आणि शोभायात्रेत सहभाग !