अमरावती, २ एप्रिल (वार्ता.) – येथे झालेल्या एक दिवसीय हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेला अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील धर्मप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला. पू. अशोक पात्रीकर आणि श्रीमती विभा चौधरी यांनी हिंदु राष्ट्र संघटक होण्यासाठी ‘साधनेचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना’ यांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध विषयांवर मार्गदर्शन, गटचर्चा आणि शेवटी उपस्थितांचे मनोगत, तसेच आपत्काळाविषयी माहिती याप्रकारे एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेत पुष्कळ धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
कार्यशाळेत सहभागी झालेल्या धर्मप्रेमींचे मनोगत
१. श्री. गौरव बैतुले, दर्यापूर – मला कार्यशाळेत जे शिक्षण आणि ज्ञान मिळाले, ते मला माझे पालकही देऊ शकलेले नाहीत. यापुढे मी समितीचे कार्य माझ्या संपर्कातील जास्तीतजास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करीन. जास्तीतजास्त वेळ धर्मकार्यासाठी देईन.
२. श्री. गणेश जोशी, मोर्शी – येथील शिस्तबद्धता आणि प्रत्येक कृती स्वतः करणे या हे मला आवडले. ‘धर्मकार्य करतांना काही चूक झाली, तर काय होईल’, ही मनातील शंका कार्यशाळेतून दूर झाली. मी मोर्शी तालुक्यात समितीचे कार्य वाढवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करीन.
३. श्री. अमित पाटील – कार्यशाळेमधून मला स्वतःच्या दोषांवर नियंत्रण मिळवून धर्मकार्यात यश कसे मिळवता येते, ते शिकायला मिळाले. मी यापुढे माझ्या स्वभावदोषांवर मात करण्याचा आणि समितीमध्ये शक्य तेवढा वेळ कार्य करण्याचा निश्चित प्रयत्न करीन.
४. सौ. अलका पेठकर – कार्यशाळेच्या दिवशी माझी कार्यालयीन कामकाजाची वेळ दुपारची होती; पण श्री. नीलेश टवलारे यांनी मला ती सकाळी करण्याचे सुचवले. प्रत्यक्षात तसे करणे अवघड असतांनाही अधिकाऱ्यांनी ती वेळ सकाळची केली. त्यामुळे मी काही घंटे कार्यशाळेत येऊ शकले, ही माझ्यासाठी मोठी अनुभूती आहे.