रामनाथी (गोवा) – हिंदु नववर्षारंभाच्या निमित्ताने म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येथील सनातनच्या आश्रमात २ एप्रिल २०२२ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्याेदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले. गुढीचे पूजन सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. ईशान जोशी यांनी केले. या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्हीच आम्हा सर्व साधकांना साधना करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी शक्ती, बुद्धी, चैतन्य अन् आध्यात्मिक बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्यात आली.