मुंबई – मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या कार्यालयातील ६८ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहेत. कार्यालयातील २३५ कर्मचार्यांची चाचणी केली असता त्यांपैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या एका अधिकार्यांनी दिली आहे.
७ जानेवारी या एकाच दिवशी मुंबईतील ९३ पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. सध्या कोरोनाबाधित ४०९ पोलिसांवर उपचार चालू आहेत. गेल्या ४८ घंट्यात २ कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १२५ झाली आहे.