रिक्षाचे देयक न दिल्याने चालकाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

सामाजिक नैतिकता ढासळत चालल्याचे हे उदाहरण आहे. आरोपींना त्वरित आणि कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. – संपादक

पुणे – शहरातील रेसकोर्स परिसरात रिक्षाचालकाने रिक्षाचे देयक न दिल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रवास करणार्‍या या मुली जवळ पुरेसे पैसे नव्हते त्याचा अपलाभ घेऊन संबंधित रिक्षाचालकाने मुलीवर बलात्कार केला.

पोलिसांनी रिक्षाचालकासह तिघांना कह्यात घेतले आहे. सागर बचुटे, विकी कुमार पासवान आणि अशोक वीर बहादूर थापा अशी आरोपींची नावे आहेत. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीअन्वये हडपसर पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून आरोपींना कह्यात घेतले. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण चालू आहे.