सातारा, ९ जानेवारी (वार्ता.) – पुणे येथील १८ रहिवाशांनी सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये १३ कोटी ६४ लाख ७१ सहस्र ८७६ रुपयांच्या चोरीसह भ्रष्टाचार केला होता. या रहिवाशांनी सातारा जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज प्रविष्ट केला होता; मात्र तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. युटोपिया भागीदाराचे समभाग संगनमताने विकल्याचे हे प्रकरण असून या गुन्ह्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
युटोपिया आस्थापनाचे प्रमुख प्रसन्न देशमुख यांनी सातारा पोलीस ठाण्यात दीड मासांपूर्वी तक्रार नोंदवली होती.