तब्बल १७ गुन्ह्यांची नोंद असलेला इचलकरंजी येथील माजी नगरसेवक संजय तेलनाडेला अटक : ५ दिवस पोलीस कोठडी
माजी नगरसेवक संजय तेलनाडे हा ‘एस्.टी. सरकार गँग’ नावाच्या टोळीने संघटित गुन्हेगारी करत असे.
माजी नगरसेवक संजय तेलनाडे हा ‘एस्.टी. सरकार गँग’ नावाच्या टोळीने संघटित गुन्हेगारी करत असे.
‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार आता शस्त्रेही भारतीय बनावटीची सिद्ध होत आहेत. हाच भाग आता औषधांच्या संदर्भात होऊन भारतीय आस्थापनांचा जगभरात नावलौकीक होईल, हे निश्चित !
महाडीकवाडी विभागात ग्रामीण बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ५० जणांनी या शिबिराच्या माध्यमातून रक्तदान करण्यासाठी सहभाग घेतला.
सातारा नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी १ जानेवारी या दिवशी वसुली विभागाची बैठक घेतली. या वेळी घेतलेल्या आढाव्यामध्ये पालिकेची वसुली केवळ १३ टक्क्यांवर येऊन ठेपल्याचे निदर्शनास आले.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला मौजमजा करतांना पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने मोरगाव तालुक्यातील खोळदा येथील गाढवी नदीच्या पात्रात उतरलेल्या राहुल काळसर्पे (वय २८ वर्षे) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
आगीसारख्या प्रकरणांच्या अहवालावर तत्परतेने कारवाई न होणे, हे चिंताजनक आहे. प्रशासनाने ही समस्या त्वरित सोडवणे अपेक्षित आहे
वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचे वाढते प्रमाण यांमध्ये लवकर न्याय मिळावा, यासाठीची उपाययोजना लवकर निघेल, असे वाटत नसल्याचा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे अहसान (वय २२ वर्षे) यांच्यावर मुसलमानांनी सामाजिक बहिष्कार घातला आहे. अहसान यांना धमकीचे दूरभाष येत आहेत.
काँग्रेसच्या १३७ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये काही साधू आले. त्यांनी डी.के. शिवकुमार यांना ‘आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आहोत’, असे सांगितले परंतु ते बसल्या जागेवरून हात जोडून ‘तुमचा आशीर्वाद नको’, असे म्हणाले.
काही ठराविक रुग्णांना ‘आंबवलेले पदार्थ टाळा’, असे सांगतांनाच ‘एक वेळ डोसा चालेल; पण इडली नको’, असे म्हटले जाते. असे का ?; याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.