गोंदिया जिल्ह्यात नववर्ष साजरे करतांना नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू !

ख्रिस्ती नववर्ष साजरे करत असतांनाचे दुष्परिणाम जाणा ! – संपादक 

गोंदिया, २ जानेवारी (वार्ता.) – नववर्षाच्या पूर्वसंध्येला मौजमजा करतांना  पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने मोरगाव तालुक्यातील खोळदा येथील गाढवी नदीच्या पात्रात उतरलेल्या राहुल काळसर्पे (वय २८ वर्षे) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.