‘कुणाला आशीर्वाद द्यायचा’, हेही न कळणारे साधू आहेत कि संधीसाधू ?

‘कुणीगल (कर्नाटक) तालुक्यातील शिवपूरमधील खासगी समुदाय भवनात काँग्रेसच्या १३७ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये काही साधू आले. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांना ‘आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आहोत’, असे सांगितले; परंतु त्यांच्या बोलण्याला किंचित्ही मान न देता डी.के. शिवकुमार बसल्या जागेवरून हात जोडून ‘तुमचा आशीर्वाद नको’, असे म्हणाले. आशीर्वाद घेण्यास नकार दिल्याचे पाहून साधू परत गेले.’