मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह निलंबित !

गृहविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

परराज्यातून येणार्‍यांसाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अनिवार्य ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘केंद्र आणि राज्य सरकारांच्या नियमावलीतील तफावत दूर केली आहे. केंद्र शासनासमवेत चर्चा करूनच आता नवीन नियमावली येईल. ‘ओमिक्रॉन’विषयी आपण अधिक काळजी घ्यायला हवी.

पालथ्या घड्यावर पाणी !

आपल्या सरकारी यंत्रणांना बहुधा मागील प्रसंगातून शिकणे ठाऊकच नाही, हे सध्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या प्रकारावरून चालू असलेल्या गोंधळावरून दिसून येते.

सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पार्कींग’ला शिस्त लावण्यासाठी नियम लागू !

‘पार्कींगला शिस्त लावण्यासाठी एकही वाहन पोर्चमध्ये येणार नाही’, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वत:पासून सूचनांचे पालन करण्यास प्रारंभ केला.

अरुणा धरणातून आज पाणी सोडण्यात येणार असल्याने सावधानतेची चेतावणी

नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ, शेतकरी यांनी नदीच्या पात्रात उतरू नये, तसेच याविषयी सतर्कता बाळगावी, असे आवाहन मध्यम पाटबंधारे प्रकल्प विभागीय पथक, आंबडपालचे कार्यकारी अभियंता ह.ग. लवंगारे यांनी केले आहे.

नगरमध्ये तरुण शेतकर्‍याची तहसील कार्यालयाच्या आवारात आत्महत्या !

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

भारतमातेला वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जागतिक स्तरावर हिंदुत्व संपवण्याचे षड्यंत्र चालू आहे, तर दुसरीकडे पाश्चिमात्य देश भारतीय संस्कृतीचे अनुकरण करत आहेत. छत्रपती शिवरायांना अपेक्षित असे हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्र पुन्हा एकदा निर्माण होणे, ही काळाची आवश्यकता आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा; अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नागरिकांना खुले करा अन्यथा नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करून खुले करू, या मागणीचे निवेदन भाजप संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी महापालिका आयुक्त यांना दिले.

सातारा जिल्हाधिकार्‍यांनी घेतले श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीचे दर्शन

क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांच्या चैतन्याने ओतप्रोत भरलेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड येथे २७ नोव्हेंबर यादिवशी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सपत्नीक भेट देऊन राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवेळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मासेमारी, पर्यटन व्यवसाय आणि शेती-बागायती यांवर परिणाम

१ डिसेंबरपासून जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक चालू झालेल्या पावसामुळे नागरिकांचीही असुविधा झाली. सोसाट्याच्या वार्‍यासह पडणार्‍या पावसामुळे वीजपुरवठाही सातत्याने खंडित होत होता.