मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. खंडणी आणि ॲट्रॅसिटी यांचे गंभीर गुन्हे नोंद असल्याने त्यांचे निलंबन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह निलंबित https://t.co/XPtaaF1wo1 Parambir Singh #ParambirSingh #MumbaiPolice
— LoksattaLive (@LoksattaLive) December 2, 2021
परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या संदर्भातील धारिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गृहविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच एका विभागाचे प्रमुख असूनही वेळेत सेवेत रुजू झाले नाहीत, असा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.