ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक
शेवगाव (जिल्हा नगर) – सोमनाथ घनवट या तरुण शेतकर्याने शेवगाव तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारातील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या खिशात सापडलेल्या ६ पानी चिठ्ठीमध्ये गंगामाई कारखान्यातील आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचास आणि दमदाटीस कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार कारखान्यातील तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार ३० नोव्हेंबर या दिवशी पहाटे उघडकीस आला.
त्यांच्या अटकेसाठी नातेवाइकांनी आग्रह धरत आंदोलन केले. त्यामध्ये गंगामाई कारखान्याचे २ अधिकारी आणि १ कर्मचारी, तसेच शेवगाव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप आहेत. या गुन्ह्यामधून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना टाळल्याने नातेवाइकांनी अप्रसन्नता व्यक्त केली.