सातारा जिल्‍हा न्‍यायालयाच्‍या महिला कक्षातच चोरी !

असुरक्षित न्‍यायालये !

सातारा, ३ डिसेंबर (वार्ता.) – येथील जिल्‍हा न्‍यायालयाच्‍या महिला कक्षातील अधिवक्‍त्‍या सविता शिंदे यांचा कोट अज्ञाताने चोरून नेला. या कोटामध्‍ये ३४ सहस्र रुपये होते. याविषयी न्‍यायालयात शोधाशोध केली; मात्र कोट कुठेही सापडला नाही. याविषयी अधिवक्‍त्‍या शिंदे यांनी शहर पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.