‘आई राजा उदो उदो’चा गजर : संबळाच्या कडकडाटात आणि कुंकवाच्या मुक्त उधळणीत श्री तुळजाभवानीदेवीचे सीमोल्लंघन !

पुजारी-भाविक यांसह मानकर्‍यांमध्ये अभूतपूर्व उत्साह, मातेची श्रमनिद्रा चालू !

कर्ज बुडवल्याप्रकरणी ‘तळवलकर्स’ व्यायामशाळेशी संबंधित आठ जणांवर गुन्हे नोंद !

मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी २०६ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याची तक्रार ॲक्सिस अधिकोषाच्या (बँकेने) वतीने करण्यात आली आहे. गिरीश तळवलकर, प्रशांत तळवलकर, विनायक गवांदे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा नोंद झाला.

नाशिक येथील न्यायालयात संजय पुनमिया यांची अटकपूर्व जामिनासाठी याचिका !

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे बेहिशोबी मालमत्ता प्रकरण

नाशिक जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया यांच्या रुग्णसंख्येत वाढ !

‘पेस्ट कंट्रोल’, धूर फवारणी करण्यात येऊन पाण्यात गप्पी मासे सोडले जात आहेत, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. व्याधींचे रुग्ण अधिक प्रमाणात असल्याने अनेक रुग्णालयांत रुग्णांसाठी खाटा मिळत नाहीत.

समाजावर होणार्‍या वाईट परिणामांचा विचार करून शासनाने गोमंतकियांना कॅसिनोत प्रवेशबंदी केली ! – उच्च न्यायालय

‘गोवा दमण अँड दीव गँबलिंग ॲक्ट २०१२’ मधील सुधारणेनुसार गोव्यातील लोकांना कॅसिनोमध्ये जुगार खेळता येणार नाही. या कायद्याला आव्हान देण्यासाठी गोव्यातील शुक्र उसगावकर यांनी गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती.

(म्हणे) ‘बंगालच्या देवी दुर्गेला (बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना) गोव्यातील भस्मासुरासारख्या सरकारला घरी पाठवण्यासाठी आणणे आवश्यक !’

‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या श्री दुर्गादेवीचा अवमान !

धोकादायक फेसबूक !

फेसबूकने त्याला धोकादायक वाटणार्‍या जगभरातील ४ सहस्र संघटनांची सूची सिद्ध केली आहे. ती गोपनीय सूची ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्तसंघटनेने उघड केली आहे. त्यात भारतातील बंदी घातलेल्या काही संघटनांच्या नावांसह सनातन संस्थेचाही समावेश केला आहे.

विनाअनुमती मिरवणूक काढल्याप्रकरणी हिंगोली येथील आमदार आणि खासदार यांसह ५०० जणांवर गुन्हे नोंद !

येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विनाअनुमती ढोलताशे वाजवत मिरवणूक काढण्यात आली होती.

पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावरील जलवाहिनी फुटल्याने सहस्रो लिटर पाणी वाया

पेडणे येथील पत्रादेवी ते धारगळ या राष्ट्रीय महामार्गावरील जलवाहिनी फुटल्याने सहस्रो लिटर पाणी वाया गेले. राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असतांना जलवाहिनीला धक्का बसून ही जलवाहिनी फुटली.

फोंडा येथील कामत रेसिडन्सीमध्ये रहाणार्‍या दोन बहिणींची हत्या

फोंडा येथील सारस्वत बँकेच्या मागे असलेल्या कामत रेसिडन्सी अपार्टमेंट या इमारतीमध्ये रहाणार्‍या दोन बहिणींची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली असून धारदार शस्त्राने त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.