कर्ज बुडवल्याप्रकरणी ‘तळवलकर्स’ व्यायामशाळेशी संबंधित आठ जणांवर गुन्हे नोंद !

मुंबई – अधिकोषाचे कर्ज बुडवल्याप्रकरणी ‘तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड’शी संबंधित आठ व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंद केला आहे. मुंबईतील गावदेवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी २०६ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याची तक्रार ॲक्सिस अधिकोषाच्या (बँकेने) वतीने करण्यात आली आहे. गिरीश तळवलकर, प्रशांत तळवलकर, विनायक गवांदे यांच्यासह ८ जणांवर गुन्हा नोंद झाला.

वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीत अधिकोषाची २०६ कोटी ३५ लाखांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करून १४ ऑक्टोबरला गुन्हा नोंद केला. ‘दीड वर्षापूर्वी चौकशी व्हावी’, अशी मागणी आम्ही केली; पण प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही बोलू शकत नाही,’ असे ‘तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि.’ यांनी सांगितले.