रुग्ण संख्येने गाठला ५ वर्षांतील उच्चांक !
नाशिक – जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचे प्रमाण वाढले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी ८८८ च्या वर गेली आहे, तर चिकनगुनियाचे रुग्ण ६३३ हून अधिक आहेत. रुग्णांचा हा ५ वर्षांतील उच्चांक ठरला आहे. परतीच्या पाऊस मोठ्या प्रमाणात होत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
‘पेस्ट कंट्रोल’, धूर फवारणी करण्यात येऊन पाण्यात गप्पी मासे सोडले जात आहेत, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. व्याधींचे रुग्ण अधिक प्रमाणात असल्याने अनेक रुग्णालयांत रुग्णांसाठी खाटा मिळत नाहीत.