दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे ! – काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी

काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंच्या होत असलेल्या हत्यांचे प्रकरण

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांच्या नातवाला सरकारी नोकरीतून काढले !

एकीकडे काश्मीरमध्ये सैन्य आतंकवाद्यांशी अहोरात्र लढत असतांना दुसरीकडे काश्मीरमधील प्रशासनात इतकी वर्षे आतंकवाद्यांचे पाठीराखे कार्यरत असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

पाथर्डीतील (नगर) मोहटादेवी गडावर अष्टमीचा होम पेटवून नवरात्रोत्सवाची सांगता !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रसिद्ध मोहटादेवी गडावर अष्टमीचा होम पेटवून नुकतीच नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.

कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील चर्चच्या शाळेत विभूती लावून आणि रुद्राक्ष घालून येणार्‍या विद्यार्थ्यांना ख्रिस्ती शिक्षकाकडून मारहाण !

पालकांची मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी

अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर भारताकडून आयोजित बैठकीसाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान यांना आमंत्रण

भारताने अफगाणिस्तानच्या सूत्रावर एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून त्यासाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान या देशांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या बैठकीस उपस्थित रहाणार आहेत.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने यमगर्णी येथे श्री दुर्गामाता दौड उत्साहात

‘श्री दुर्गामाता दौड म्हणजे तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती बिंबवण्याचे केंद्र होय’, असे मार्गदर्शन पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.

संभाजीनगर येथे पत्नीपीडित संघटनेकडून शूर्पणखेच्या प्रतिमेचे दहन !

विजयादशमीच्या दिवशी सर्वत्र रावणाचे दहन केले जाते; मात्र जिल्ह्यातील करोडी येथील पत्नीपीडित पुरुष आश्रमात रावणाची बहीण शूर्पणखा हिचे प्रतिमा दहन करून महिलांमधील अपप्रवृत्तींचा निषेध व्यक्त करण्यात आला.

रामलीलेमध्ये पुत्रवियोगाच्या प्रसंगात राजा दशरथाचा अभिनय करणार्‍याने प्रत्यक्षात सोडले प्राण !

प्रसंग संपल्यानंतर सहकार्‍यांनी राजेंद्र सिंह यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. गेल्या २० वर्षांहून ते ही भूमिका निभावत होते.

काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून एका हिंदूंची हत्या

आज ३३ वर्षांनंतरही काश्मीर हिंदूंसाठी असुरक्षितच आहे, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

गेल्या ३ वर्षांत देशात सरासरी ११२ लोकांचा अमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यू

समाजाला साधना न शिकवल्यामुळे आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई न झाल्याचाच हा परिणाम आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात ही स्थिती नसेल !