अफगाणिस्तानच्या प्रश्‍नावर भारताकडून आयोजित बैठकीसाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान यांना आमंत्रण

 

नवी देहली – भारताने अफगाणिस्तानच्या सूत्रावर एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले असून त्यासाठी रशिया, चीन आणि पाकिस्तान या देशांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या बैठकीस उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीसाठी भारताने १० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर असे २ दिनांक सूचवले आहेत. अफगाणिस्तानवरील तालिबानची सत्ता आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्‍न, यांवर उत्तर शोधणे, हा या बैठकीचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.