काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून एका हिंदूंची हत्या

पुलवामध्येही एका मुसलमानाची हत्या

आज ३३ वर्षांनंतरही काश्मीर हिंदूंसाठी असुरक्षितच आहे, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये पुन्हा एकदा जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केले. श्रीनगरच्या ईदगाह येथे रस्त्यावरील फेरीवाले अरविंद कुमार साहा यांना आतंकवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले. ते मुळचा बिहार येथील रहाणारे होते. दुसर्‍या घटनेत पुलवामा येथे एका सगीर अहमद या सुताराला गोळ्या झाडून ठार केले. ते मूळचे उत्तरप्रदेशातील आहेत. पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. आणि जिहादी आतंकवादी संघटना यांनी काश्मीरमध्ये २०० मुसलमानेतरांना ठार मारण्याचे लक्ष्य ठेवल्याची गोपनीय माहिती मिळालेली आहे. त्या षड्यंत्रानुसारच या हत्या होत आहेत, असे सांगितले जात आहे. (पाकिस्तान आणि जिहादी आतंकवादी संघटना काश्मीरमध्ये आक्रमणे करण्याचे षड्यंत्र रचतात आणि ते कृतीतही आणतात, हे भारतीय सुरक्षादलांना लज्जास्पद ! काश्मीरमधील आतंकवाद नष्ट न होण्यामागे पाकिस्तान कारणीभूत असल्याने त्याला नष्ट केल्यावरच हा आतंकवाद नष्ट होईल ! – संपादक)