पालकांची मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी
तमिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रमुकचे सरकार असल्याने त्याच्याकडून हिंदूंना न्याय मिळण्याची शक्यता नाही. अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे ! – संपादक

कांचीपूरम् (तमिळनाडू) – येथे १० वी इयत्तेत शिकणार्या किरुबाकरण आणि किरुबानंदन या विद्यार्थ्यांनी गळ्यामध्ये रुद्राक्ष घातल्याने आणि कपाळावर विभूती लावल्याने त्यांना ख्रिस्ती शिक्षक जॉयसन यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. याविषयी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. चर्चकडून चालवण्यात येणार्या येथील सरकारी अनुदान मिळणार्या अँडरसन उच्च माध्यमिक शाळेत ही घटना घडली. (सरकारी अनुदानावरून चालणार्या अशा शाळेला मिळणारे अनुदान सरकारने रहित करावे, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुढाकार घेतला पाहिजे ! – संपादक) वर्ष २०१७ मध्येही जॉयसन यांनी अशा प्रकारे हिंदु विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. त्या वेळी त्यांना अटकही करण्यात आली होती. (एकदा अटक करण्यात येऊनही या शिक्षकाच्या मानसिकतेत काहीच पालट झालेला नाही. तसेच त्यांना शाळेतूनही काढण्यात आलेले नाही. यातून चर्च संचालित शाळांमध्ये हिंदूंच्या धार्मिक परंपरांचा विरोध करण्यास या शिक्षकांना सांगितले जात असणार हेच स्पष्ट होते ! त्यामुळे हिंदूंनी त्यांच्या मुलांना अशा शाळेत शिक्षणासाठी न पाठवणेच योग्य ! – संपादक)
रुद्राक्ष पहनने और चंदन लगाने की सज़ा: सरकार पोषित स्कूल में ईसाई शिक्षक ने छात्रों को पीटा, माता-पिता ने CM स्टालिन से लगाई गुहार#Kanchipuram #TamilNaduhttps://t.co/anOGM0DSUD
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 16, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन