नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने यमगर्णी येथे श्री दुर्गामाता दौड उत्साहात

श्री दुर्गामाता दौड म्हणजे तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती बिंबवण्याचे केंद्र ! – पू. प्राणलिंग स्वामीजी

श्री दुर्गामाता दौडीच्या प्रसंगी संगमेश शिवयोगी (झेंडा घेतलेले) शेजारी पू. प्राणलिंग स्वामीजी आणि अन्य…

यमगर्णी (कर्नाटक), १७ ऑक्टोबर – नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने यमगर्णी येथे श्री दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली. प्रथम ग्रामदैवत श्री यमकाई मंदिर येथे आरती करण्यात आली. यानंतर पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. ‘निपाणी पोलीस सर्कल’चे पोलीस अधिकारी संगमेश शिवयोगी यांनी दौडीत भगवा ध्वज घेतला होता. विविध चौकांमध्ये दौडीचे स्वागत करण्यात आले. प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र म्हणून दौडीची सांगता करण्यात आली. ‘श्री दुर्गामाता दौड म्हणजे तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती बिंबवण्याचे केंद्र होय’, असे मार्गदर्शन पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.

दौड पथकातील युवती आणि दौडीतील सहभागी तरुण यांचे महिलांनी रांगोळी काढून आणि आरती करून स्वागत केले. दौडीत देशभक्तीपर गीते, पोवाडे म्हणण्यात आले, तर राष्ट्राभिमान जागवणार्‍या घोषणा देण्यात आल्या.