गेल्या ३ वर्षांत देशात सरासरी ११२ लोकांचा अमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यू

समाजाला साधना न शिकवल्यामुळे आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई न झाल्याचाच हा परिणाम आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! हिंदु राष्ट्रात ही स्थिती नसेल ! – संपादक

नवी देहली – भारतात गेल्या ३ वर्षांत सरासरी ११२ लोकांचा अमली पदार्थांच्या व्यसनामुळे मृत्यू झाल्याची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे औषधांच्या अतीसेवनामुळे होणार्‍या मृत्यूच्या घटना २० टक्क्यांनी अल्प झाल्या आहेत.

१. या आकडेवारीनुसार वर्ष २०१७ ते २०१९ या ३ वर्षांत महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या व्यसनामुळे एकूण १०२ लोकांचा मृत्यू झाला.

२. राजस्थानमध्ये वर्ष २०१७ मध्ये १२५, २०१८ मध्ये १५३ आणि २०१९ मध्ये ६० लोकांचा अमली पदार्थ अन् अन्य व्यसने यांमुळे मृत्यू झाला. उत्तरप्रदेशात २०१७ ते २०१९ या कालावधीत या व्यसनांमुळे एकूण २३६ लोकांचा मृत्यू झाला, तर मध्यप्रदेशातील हीच आकडेवारी १४० इतकी होती.