पाथर्डी (नगर), १७ ऑक्टोबर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत तालुक्यातील प्रसिद्ध मोहटादेवी गडावर अष्टमीचा होम पेटवून नुकतीच नवरात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. या वेळी जिल्हा न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा आणि सौ. मालती यर्लागड्डा यांच्या हस्ते होमहवन विधी झाला. वेदमूर्ती नारायणदेवा खोकरमोहकर, राजूदेवा मुळे, भूषण साखरे, रवी देवा जोशी यांनी पौरोहित्य केले. कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन, ओटी भरणे आदी विधी करून देवीचा स्वयंभू तांदळ्यावर गंगाजलाने अभिषेक केला. या वेळी ‘मोहटा देवस्थान’चे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.