बीड – मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी गळ्यात हार घालणार नाही, अशी घोषणा भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही, असे घोषित केले होते. दसर्याच्या निमित्ताने भगवान गडावर आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. या वेळी पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या सर्वांसाठी मी आवाज उठवणार आहे. मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्यात भांडण लावण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आपला आवाज देहलीपर्यंत पोचतो ! – खासदार प्रीतम मुंडे
आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही, मुंबईपर्यंत नाही, तर देहलीपर्यंत पोचतो. हा कुठल्या पक्षाचा मेळावा नाही, तर हा मेळावा भगवानबाबांच्या भक्तांचा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणार्या प्रत्येक माणसाचा आहे, असे मत खासदार प्रीतम मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे भगवान गडावरील दसरा मेळाव्यात व्यक्त केले.