कोलकाता उच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप करण्यास नकार
‘हिंदूंच्या धार्मिक उत्सवांचे ठिकाण हे सामाजिक विषयांसाठी नाही’, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे ठाऊक नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारचे हिंदुद्रोही कृत्य करतात, हे लक्षात घ्या !
कोलकाता (बंगाल) – येथील डमडम पार्कमधील भारत चक्र पूजा समितीच्या श्री दुर्गादेवी पूजा मंडपामध्ये चपलांचे प्रदर्शन लावल्याच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. याचिकाकर्ते शांतनु सिंघा यांनी याचिकेमध्ये ‘असे प्रदर्शन भरवल्यामुळे देवीचा अवमान झाला’, असे म्हटले होते. याविषयी सरकारकडून सांगण्यात आले की, याविषयी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रतिवादींकडून युक्तीवाद करतांना ‘चपलांचे प्रदर्शन गर्भागृहामध्ये भरवण्यात आले नव्हते. ते देवीच्या मूर्तीपासून ११ फुटांवर होते. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा विरोध म्हणून चपलांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते’, असे सांगण्यात आले.
सौजन्य : हिंदुस्तान टाइम्स