नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. नीलेश नागरे यांना श्रीकृष्णाचे छायाचित्र भेट देतांना श्री. रवींद्र सोनईकर (डावीकडे)

जळगाव – नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, ही आनंददायी वार्ता सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी २ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या एका ‘ऑनलाईन’ सत्संगात उपस्थितांना दिली. ही वार्ता ऐकल्यावर अनेक साधकांची भावजागृती झाली. या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रवींद्र सोनईकर यांनी श्री. नागरे यांना श्रीकृष्णाचे छायाचित्र देऊन त्यांचा सत्कार केला. श्री. नागरे यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांनी त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्येही या वेळी सांगितली.