नवरात्रीसारखे उत्सव साजरे करण्यासाठी देवीला चांगली गुणवत्ता असलेले पूजासाहित्य अर्पण करा !

पू. तनुजा ठाकूर

१. शुद्ध स्वरूपातील पूजासाहित्याचे मूल्य अधिक असणे

अ. ‘शुद्ध स्वरूपातील पूजासाहित्य मिळत असले, तरी त्याचे मूल्य अधिक असते.

आ. यंत्रांद्वारे बनवलेल्या चौकोनी कापूर वड्यांमध्ये रसायन असून तो सात्त्विक नसतो. शुद्ध भीमसेनी कापराचे मूल्य अधिक आहे; परंतु तो सात्त्विक असतो.

इ. बाजारपेठेत देशी गायीचे शुद्ध तूप १२०० रुपये प्रती किलो किंवा त्यापेक्षाही अधिक मूल्य देऊन मिळते.

२. पूजेचा लाभ होण्यासाठी सात्त्विक साहित्य वापरावे !

२ अ. ग्राहकांच्या मागणीनुसार ‘चांगली आणि अल्प गुणवत्ता असलेले साहित्य दुकानात ठेवावे लागते’, असे दुकानदाराने सांगणे : एकदा मी पूजेसाठी तिळाचे तेल घेण्यासाठी दुकानात गेले असता दुकानदाराने मला विचारले, ‘‘चांगल्या गुणवत्तेचे तेल पाहिजे का ?’’ मी त्यांना ‘‘याचा अर्थ काय ?’’, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘काही जणांना पूजेसाठी अल्प मूल्य असणारे साहित्य हवे असते. त्यामुळे आम्हाला सर्व प्रकारचे साहित्य ठेवावे लागते.’’

२ आ. उत्सव सात्त्विक पद्धतीने साजरे करण्यासाठी आधीपासूनच पैशांची बचत करा ! : कर्मकांडानुसार पूजा करतांना आपण सात्त्विक पूजा साहित्याचाच उपयोग केला पाहिजे, अन्यथा आपल्याला त्याचा लाभ होत नाही. नवरात्रीसारखे उत्सव सात्त्विक पद्धतीने साजरे करण्यासाठी आर्थिक अडचण असणार्‍यांनी काही मास आधीपासूनच पैशांची बचत करावी.’

– पू. तनुजा ठाकूर (७.१०.२०२१)